kimaya narayan
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ही मालिका सुपरहिट झाली. या मालिकेतील देविकाची भूमिका सगळ्यांना आवडली.
नाईकांचा धाकटा मुलगा अभिरामची होणारी बायको असलेली देविका सगळ्यांना आवडली. ही भूमिका नुपूर चितळेने साकारली होती.
पदार्पणातच नुपूर सुपरहिट ठरली. तिने फुलपाखरू या मालिकेतही काही काळ काम केलं होतं. पण नंतर नुपूर बराच काळ मालिकेत दिसली नाही.
रात्रीस खेळ चाले या मालिकेनंतर नुपूरने मालिकाविश्वातून ब्रेक घेतला. ती थेट गेली दिल्लीला एनएसडी म्हणजेच नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये.
कॉलेंजमध्ये शिकत असतानाच नुपूर रात्रीस खेळ चाले मध्ये काम करत होती. पण कॉलेज संपल्यानंतर तिने लगेच नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला आणि तिथे तिने तिचं शिक्षण पूर्ण केली.
सहा वर्षांनी नुपूर दिल्लीतून परत आली आहे. आता पुन्हा ती मालिकाविश्वात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.
नुपूरचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेत असतात.