Monika Shinde
बाजारात फळे खरेदी करताना लहान स्टिकर्स नेहमी दिसतात. बहुतेक लोकांना वाटते की ते फक्त ब्रँडिंगसाठी आहेत, पण त्यामागे खास माहिती लपलेली असते.
प्रत्येक फळावर छोटा PLU कोड असतो. हा कोड फळाची उत्पादन पद्धत आणि गुणवत्ता दर्शवतो. तुम्ही कोड पाहून फळ सेंद्रिय आहे की नाही, सहज ठरवू शकता.
PLU कोड सहसा ४ किंवा ५ अंकांचा असतो. या अंकांवरून फळ कसे पिकवले गेले आहे, त्याची माहिती मिळते, म्हणजे आरोग्यासाठी योग्य फळ निवडता येते.
जर कोड ५ अंकांचा असेल आणि 9 ने सुरू झाला असेल, तर फळ पूर्णपणे सेंद्रिय आहे. यात कोणतेही कीटकनाशक किंवा रासायनिक खत वापरलेले नसते.
जर कोड फक्त ४ अंकांचा असेल, तर फळ कीटकनाशक आणि रासायनिक खतांनी पिकवलेले असते. अशा फळांचा स्वाद किंवा पौष्टिकता कमी असते.
सेंद्रिय ५-अंकी फळे निवडा. ही फळे शरीरासाठी अधिक फायदेशीर असतात आणि नैसर्गिक पोषण टिकवून ठेवतात, त्यामुळे आरोग्याला फायदा होतो.
सेंद्रिय किंवा प्रक्रिया केलेली फळे खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवा. त्यामुळे धूळ, बॅक्टेरिया किंवा अशुद्धी दूर होतात, आणि फळ सुरक्षित राहते.