पोटात जळजळ अन् गॅस? मग 'ही' 5 फळे खाताना सावधान!

Aarti Badade

फळे आणि पोटाच्या समस्या

फळे आरोग्यासाठी उत्तम असली तरी, चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या फळांच्या सेवनामुळे गॅस, छातीत जळजळ आणि पोट फुगण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Stomach burning causes

|

sakal

संत्री आणि मोसंबी

संत्री आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये 'सायट्रिक ऍसिड'चे प्रमाण जास्त असते. याचे अतिसेवन केल्यास ॲसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ वाढू शकते.

Stomach burning causes

|

Sakal

लिंबू - रिकाम्या पोटी धोकादायक

लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड भरपूर असते. विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने गॅस्ट्रिक ऍसिडचे उत्पादन वाढून पोटाला त्रास होऊ शकतो.

Stomach burning causes

|

Sakal

अननस आणि पित्त

अननसाचा गुणधर्म आम्लयुक्त असतो. यातील एन्झाइम्स संवेदनशील आतड्यांना त्रास देऊ शकतात, ज्यामुळे पित्त वाढून पोटातील जळजळ अधिक तीव्र होते.

Stomach burning causes

|

sakal

कच्चा आंबा आणि द्राक्षे

कच्चा आंबा पचायला जड असतो, ज्यामुळे अपचन होऊ शकते. तसेच आंबट द्राक्षांमुळे शरीरातील पित्त वाढून गॅस आणि फुशारकीची समस्या निर्माण होते.

Stomach burning causes

|

Sakal

पेरू आणि बियांचा अडथळा

पेरूच्या बिया पचायला कठीण असतात. बियांसोबत जास्त पेरू खाल्ल्याने पचनक्रियेत अडथळा येतो आणि पोट फुगल्यासारखे वाटू लागते.

Stomach burning causes

|

Sakal

आयुर्वेदाचा मोलाचा सल्ला

आयुर्वेदानुसार, ज्यांचे पचन मंद आहे त्यांनी आंबट आणि तिखट फळे मर्यादित खावीत. पोट थंड ठेवण्यासाठी केळी किंवा टरबूज यांसारख्या फळांची निवड करणे अधिक श्रेयस्कर आहे.

Stomach burning causes

|

Sakal

किडनी शरीरातून निकामी का होते? 'हे' 7 संकेत दुर्लक्ष करू नका!

kidney damage symptoms 

|

Sakal

येथे क्लिक करा