किडनी शरीरातून निकामी का होते? 'हे' 7 संकेत दुर्लक्ष करू नका!

Aarti Badade

किडनीचे शरीरातील महत्त्व

किडनी हा शरीराचा असा महत्त्वाचा भाग आहे जो रक्त शुद्ध करणे, घातक टॉक्सिन्स बाहेर काढणे आणि पाण्याचे संतुलन राखण्याचे काम करतो.

kidney damage symptoms 

|

Sakal

किडनी खराब होण्याची प्रमुख कारणे

मधुमेह, उच्च रक्तदाब, कमी पाणी पिणे आणि वेदनाशामक औषधांचा अतिवापर यांमुळे किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो.

kidney damage symptoms 

|

Sakal

चेहरा आणि पायांवर सूज येणे

जर किडनी योग्य प्रकारे काम करत नसेल, तर शरीरात पाणी साठू लागते. परिणामी पाय, गुडघे, हात किंवा चेहऱ्यावर सूज दिसू लागते.

kidney damage symptoms 

|

Sakal

लघवीमध्ये होणारे बदल

वारंवार लघवीला होणे, लघवीचे प्रमाण अचानक कमी होणे किंवा लघवीचा रंग गडद होणे, ही किडनीच्या समस्येची सुरुवातीची लक्षणे आहेत.

सततचा थकवा आणि अशक्तपणा

किडनी निकामी झाल्यावर शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, ज्यामुळे कोणतीही हालचाल न करताही व्यक्तीला प्रचंड थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

kidney damage symptoms 

|

Sakal

भूक न लागणे आणि मळमळ

किडनीच्या आजारामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे भूक मंदावते, सतत उलट्या झाल्यासारखे वाटते आणि जेवणाची इच्छा होत नाही.

kidney damage symptoms 

|

Sakal

त्वचेला खाज सुटणे

जेव्हा किडनी रक्तातील टॉक्सिन्स बाहेर काढू शकत नाही, तेव्हा रक्तातील अशुद्धता वाढते. याचा परिणाम त्वचेवर होऊन सतत खाज येण्याची समस्या निर्माण होते.

kidney damage symptoms 

|

Sakal

हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय? 'हे' 5 सुपरफूड्स वाढवतात 'गुड कोलेस्ट्रॉल'!

Good cholesterol foods for heart

|

Sakal

येथे क्लिक करा