Fruits In Summer : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी खायलाच हवीत ‘ही’ फळे

Monika Lonkar –Kumbhar

उन्हाळा

उन्हाळ्याला सुरूवात झाली असून, या दिवसांमध्ये आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. ही कमतरता दूर करण्यासाठी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो.

Fruits In Summer

आंबा

आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, कॅल्शिअम, कॉपर आणि इतर पोषकघटक आढळतात. उन्हाळ्यात आंबा जरूर खा.

Fruits In Summer

सफरचंद

सफरचंद चवीला गोड आणि शीत असते, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास याची मदत होऊ शकते.

Fruits In Summer

कलिंगड

उन्हाळ्यातील कडक झळांपासून शरीराला आराम मिळवून देण्यासाठी कलिंगड हे फळ अतिशय फायदेशीर मानले जाते. कलिंगडामध्ये 90% पाण्याचे प्रमाण आढळून येते. 

Fruits In Summer

खरबूज

खरबूज या फळामध्ये आरोग्याचा खजिना लपलेला आहे. खरबूज हे फळ चवीला सौम्य गोड लागते. या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए चे विपुल प्रमाण आढळून येते. 

Fruits In Summer

द्राक्षे

द्राक्ष चवीला गोड, पौष्टिक, पित्तदोष, रक्तविकार आणि अति तहान यांना प्रतिबंध करणारी असतात. द्राक्षांचा रस घेणेही उत्तम असते.

Fruits In Summer

डाळिंब

डाळिंब हे फळ चवीला गोड असते. तसेच, डाळिंब पचनाला मदत करणारे, पित्तशामक आणि हृदयासाठी उत्तम असते.

Fruits In Summer

संत्रा

हे फळ उन्हाळ्यात पित्तशमन करण्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. त्यामुळे, या फळाचा आहारात जरूर समावेश करावा.

Fruits In Summer

धकधक गर्लचा 'हा' रॉयल अंदाज पाहून पडाल प्रेमात!

Madhuri Dixit | esakal