Anushka Tapshalkar
अॅनिमिया प्रामुख्याने रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे होतो. त्यामुळे रोजच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश असणे गरजेचे असते.
लोह शरीरातील ऑक्सिजन वाहून नेणे, ऊर्जा उत्पादन करणे, आणि पेशींच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे. ॲनिमियापासून बचाव व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पुढील फळे उपयुक्त आहेत.
अननस लोहाने समृद्ध असून, पचन सुधारण्यासही मदत करते.
डाळिंब हेमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते; लोहाने भरपूर असलेले हे फळ ॲनिमियासाठी उपयुक्त आहे.
केळे शरीराला आवश्यक ऊर्जा आणि लोह पुरवते, त्यामुळे थकवा कमी होतो.
सफरचंदामध्ये लोह आणि ॲन्टीऑक्सिडंट्स मुबलक असतात.
संत्र्यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे शरीरात लोह शोषण चांगल्या प्रकारे होते.
लोहाने समृद्ध असलेला आंबा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
पेरूमध्ये लोहासह भरपूर पोषणमूल्ये आहेत, ज्यामुळे रक्ताच्या कमतरतेसाठी मदत होते.
या छोट्या फळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असून, ते रक्त शुद्धीकरणासाठी उपयुक्त आहे.