सकाळ डिजिटल टीम
आपल्या आरोग्याची काळजी घेताना आपण अनेक प्रकारची फळं खातो. मात्र, काही फळं अशीही आहेत जी केवळ चवीलाच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अमूल्य ठरतात. त्यापैकीच एक म्हणजे हिरवं केळ.
हिरव्या केळामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये विशेषतः फायबर, पेक्टिन, रेसिस्टंट स्टार्च आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळते.
हिरव्या केळातील रेसिस्टंट स्टार्च आणि पेक्टिन हे घटक रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे डायबेटिस असणाऱ्यांसाठी हे फळ अतिशय उपयुक्त ठरू शकते.
हिरव्या केळामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पाचनक्रिया सुरळीत होते आणि कब्ज दूर होतो.
पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने, हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी हिरवं केळ उपयुक्त आहे. हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत करते.
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर हिरव्या केळाचा आहारात समावेश फायदेशीर ठरतो.
हिरवं केळ हे एक सोपं, स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे, जे ब्लड शुगरपासून वजन नियंत्रणापर्यंत विविध आरोग्य समस्यांवर सकारात्मक परिणाम करू शकतं. तुम्ही अजूनही तुमच्या आहारात याचा समावेश केला नसेल, तर आजच विचार करा!