Monika Shinde
यकृत (लिव्हर) खराब होऊ नये म्हणून आहारात काही विशिष्ट फळांचा समावेश केल्यास फायदेशीर ठरतो.
सफरचंदमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे यकृतातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करतात.
द्राक्षंमध्ये अँटीऑक्सिडंट्स (रेसव्हेराट्रोल) भरपूर असतात, जे लिव्हर पेशींचं संरक्षण करतात.
पपई पचनासाठी चांगली असून लिव्हरवर ताण कमी करते. त्यातील पपेन एंझाइम टॉक्सिन्स कमी करतो.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे लिव्हर डिटॉक्ससाठी उपयुक्त ठरतात.
या फळांमध्ये पॉलीफेनॉल्स असतात जे लिव्हर पेशींचं नुकसान कमी करतात.