म्हातारपणी आरोग्य टिकवायचंय? मग 'ही' फळं भरपूर खा, ही खाऊ नका!

सकाळ डिजिटल टीम

वृद्धांनी टाळावीत अशी ५ फळे :

फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, मात्र प्रत्येक वयोगटासाठी सर्व फळे उपयुक्तच असतील असं नाही. विशेषतः वयोवृद्ध व्यक्तींनी (60 वर्षांनंतर) काही विशिष्ट फळांपासून दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे.

Fruits To Avoid After 60 | esakal

आंबा

आंब्यामध्ये नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे वृद्ध वयात हे फळ मधुमेह, वजनवाढ, पचनसंस्था बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते.

Fruits To Avoid After 60 | esakal

चिकू

चिकू खूप गोड फळ आहे. यातील साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेही आणि वृद्धांनी या फळाचे सेवन टाळावे.

Fruits To Avoid After 60 | esakal

लिची

लिचीही गोडसर आणि पचायला जड फळ आहे. अधिक लिची खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते आणि पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मधुमेह असल्यास हे फळ पूर्णपणे टाळा.

Fruits To Avoid After 60 | esakal

टरबूज

टरबूजाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे ते रक्तातील साखर पातळीत झपाट्याने बदल घडवून आणते. शिवाय, हे फळ पचायला कठीण असून, वृद्धांना गॅस, अ‍ॅसिडिटी आणि पोटफुगीसारखे त्रास होऊ शकतात.

Fruits To Avoid After 60 | esakal

अती गोड फळे

सर्वसाधारण गोडसर फळे जसे की अतिपक्व केळी, अंजीर इत्यादींमध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वृद्धांनी यांचे सेवन मर्यादित ठेवावे.

Fruits To Avoid After 60 | esakal

मग, कोणती फळे खावीत?

आरोग्यतज्ञांच्या मते, काही फळांना ‘सुरक्षित’ आणि ‘उपयुक्त’ फळे म्हणवले आहे. त्यानुसार वयोवृद्धांनी खालील फळांचे नियमित व मर्यादित प्रमाणात सेवन करावे :

  • आवळा – रोगप्रतिकारशक्ती वाढवतो

  • जांभूळ – मधुमेह नियंत्रणात ठेवतो

  • डाळिंब – मेंदू व हृदयासाठी उत्तम

  • पपई – बद्धकोष्ठता व पचनासाठी उपयुक्त

  • पेरू – फायबरयुक्त आणि साखरेचा परिणाम कमी

Fruits To Avoid After 60 | esakal

मधुमेहींसाठी गोड बातमी! 'ही' पाने ठरणार आरोग्यासाठी वरदान; साखरही नियंत्रणात राहिल अन्..

Stevia for Diabetes | esakal
येथे क्लिक करा..