सकाळ डिजिटल टीम
काल चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स संघांदरम्यान चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आयपीएलच्या १८ व्या हंगामातील तिसरा सामना रंगला.
सामन्यात यजमान चेन्नईने मुंबईचा ४ विकेट्सने पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा डाव घरंगळला व त्यांनी चेन्नईला विजयसाठी सोपे आव्हान दिले.
सामन्यात मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला.
मुंबईने चेन्नईसमोर विजयासाठी १५६ धावांचे सोपे लक्ष्य ठेवले.
प्रत्युत्तरात चेन्नईचा सलामीवीर रचिन रविंद्रने नाबाद ६५ धावांची खेळी केली.
तर कर्णधार ऋतुराज गायकवाडने देखील जलद अर्धशतक ठोकले.
सामन्यात माजी कर्णधार एमएस धोनी फलंदाजीसाठी आला पण त्याला एकही धाव करता आली नाही.