गाडगेबाबांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात सुरू झाली गोरक्षण संस्था

Shubham Banubakode

गोरक्षण

राज्यात आपल्यालाला ठिकठिकाणी गोरक्षण संस्था दिसते. या गोरक्षण संस्थेत गायींचा सांभाळ केला जातो.

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

कशी सुरु झाली?

पण तुम्हाला माहिती आहे का? की ही गोरक्षण संस्था नेमकी कशी सुरु झाली?

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

संकल्पना

राज्यात आज ज्या गोरक्षण संस्था आहेत, त्याची संकल्पना गाडगेबाबांनी मांडली होती.

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

चळवळ

गाडगेबाबांच्या संकल्पनेतूनच राज्यात गोरक्षणाची चळवळ उभी राहिली.

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

बिकट

त्याकाळी शेतकरी म्हातारी गुरे कसाईला विकत. म्हाताऱ्या गुरांची व्यवस्था हा बिकट प्रश्न होता.

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

विकणं

गुरांना काम झालं की विकणं बरोबर नाही, असं गाडगेबाबा म्हणत. गुरांना कसाईच्या हाती देणं बाबांना आवडत नसे.

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

संस्था

म्हाताऱ्या गुरांसाठी एखादी संस्था उभी करावी, असा विचार गाडगेबाबा करू लागली.

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

गृहस्थ

त्यासाठी ते जागेच्या शोधात होते. मूर्तिजापूरला नानासाहेब जमादार नावाचे एक श्रीमंत गृहस्थ होते.

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

दानशूर

कसाई बाजाराला लागूनथ त्यांची भरपुर शेती होती. ते स्वभावाने सालस व दानशूर वृत्तीचे होते.

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

परिचय

गाडगेबाबांशी त्यांचा थोडाफार परिचय होता. नानासाहेबांना बाबांच्या कार्याची प्रचिती व तळमळ माहित होती.

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

इच्छा

अनाथ गुरांच्या संस्थेसाठी कार्य करण्याची इच्छा बोलून दाखवित्ताच नानासाहेबांनी बाजाराला लागून असलेली ५६ एकर शेती देण्याचे कबूल केले.

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

सुरवात

कामाला सुरवात झाली. बाबांच्या प्रेरणेने मूर्तिजापूरला पहिली गोरक्षण संस्था आकार घेऊ लागली.

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

गुरांना

काही दिवसांतच म्हाताऱ्या गुरांना लोक गोरक्षणात आणून सोडू लागले. त्यासोबत चारापाणी, कुटार कडबाही आणून देऊ लागले.

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

रोष

कसायाचा रोष बाबांना पचवाचा लागला. पण जनतेच्या दृष्टीने एका नवीन कामाची सुरवात करून बाबांनी त्यांना वाईटापासून परावृत्त केले.

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

भूतदया

भूतदयेचा हा उत्कृष्ट नमूना होता. यानंतर अशा गोरक्षण संस्था गावोगांव उभ्या होऊ लागल्या. आज या गोरक्षणाचं जाळं राज्यभर पसरलं आहे.

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

संदर्भ

महाराष्ट्र राज्य साहित्य महामंडळद्वारा प्रकाशित संत गाडगेबाबा ( काल आणि कर्तृत्व) पुस्तकातील लेख

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal

गाडगेबाबांनी १९५० च्या कुंभमेळ्यात केलं होतं किर्तन, दिला होता 'हा' संदेश

GadgeBaba started gorakshan sanstha | esakal
हेही वाचा -