मनात विचार केला अन् फोनवर जाहिरात आली! असं का होतं?

संतोष कानडे

विचार

तुम्ही एखाद्या वस्तूचा मनात विचार करता आणि अचानक सोशल मीडियावर हुबेहूब त्याचीच जाहिरात दिसते? हे कसं घडतं?

मोबाईल

अनेकदा आपल्याला वाटतं की मोबाईलमध्ये काहीतरी जादू झालीय..किंवा तो आपले विचार वाचू शकतो. पण यामागे तंत्रज्ञानाचा खेळ आहे

ॲप्स डाऊनलोड

तुम्ही अनेक ॲप्स डाऊनलोड करताना त्यांना 'Microphone' ची परवानगी देता. काही ॲप्स बॅकग्राउंडमध्ये तुमचे शब्द ऐकत असतात आणि त्यानुसार डेटा गोळा करतात.

अल्गोरिदम

आजचे एआय अल्गोरिदम इतके हुशार आहेत की, तुम्ही पुढे काय विचार करू शकता, याचा ते तुमच्या आधीच अंदाज लावतात.

गुगल

तुम्ही गुगलवर काय शोधलं? कोणत्या यूट्यूब व्हिडिओवर किती वेळ थांबलात? अगदी एखाद्या पोस्टवर दोन सेकंद जास्त स्क्रोल करणं थांबवलात.. या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवली जाते.

एआय

तुमचे वय, लिंग, राहण्याचे ठिकाण आणि तुमच्या मित्रांच्या आवडीनिवडी यावरून एआय एक 'पॅटर्न' तयार करतो. जर तुमच्या मित्राने एखादी वस्तू खरेदी केली, तर एआय तुम्हालाही ती दाखवतो.

मॉल

तुम्ही एखाद्या दुकानाजवळून गेलात किंवा मॉलमध्ये थांबलात, तर तुमच्या लोकेशनवरून एआय ओळखतो की तुम्हाला कशात रस असू शकतो आणि लगेच त्याची जाहिरात स्क्रीनवर येते.

वैयक्तिक डेटा

मोठ्या कंपन्या तुमचा वैयक्तिक डेटा विकत नाहीत, तर तुमच्या 'सवयींचा डेटा' कंपन्यांना जाहिराती दाखवण्यासाठी दिला जातो. याला 'टार्गेटेड ॲडव्हर्टायझिंग' म्हणतात.

परवानगी बंद करा

जर तुम्हाला हे थांबवायचं असेल, तर फोनच्या Settings मध्ये जाऊन नको असलेल्या ॲप्सची 'Microphone', 'Location' आणि 'Tracking' ची परवानगी बंद करा.

शक्तिवर्धन करण्यासाठी मुघल कोणते व्यायाम करायचे?

<strong>येथे क्लिक करा</strong>