संतोष कानडे
शारीरिक बल टिकवण्यावर मुघलांचं विशेष लक्ष असायचं. युद्धासह इतर शारीरिक गरजा पार पडण्यासाठी मुघलांनी कसरतीला महत्त्व दिलं होतं.
मुगदर फिरवणे, ही जुनी भारतीय कसरत मुघलांनीही अंगिकारली होती. जड लाकडी मुगदर फिरवून खांदे, छाती आणि हात मजबूत केले जात.
शरीराची ताकद आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी हे दंड आणि बैठका सर्वात सामान्य व्यायाम होता.
धनुष्यबाण चालवण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतले जाई. त्यामुळे पाठीचे स्नायू मजबुत व्हायचे.
आखाड्यातील कुस्ती हा राजघराण्यांमध्ये प्रतिष्ठेचा व्यायाम मानला जायचा. मुघलांमध्येही कुस्ती रंगायची.
लष्करी कवायतींमध्ये सैन्यासोबत धावणे, युद्धरचना आणि सराव करण्यात मुघल सम्राट सहभागी होत असत.
तलवार चालवण्याचा रोज सराव केला जाई. मुघल सैन्य आणि सम्राटांचा हा दिनक्रम असे.
जंगलामध्ये शिकारीसाठी जाणे हेही एक प्रकारचे शारीरिक प्रशिक्षण मानले जात असे.
मुघल सम्राट तासन्तास घोडेस्वारी करत असत. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या प्रवासाची सवय होण्यास मदत होत असे.
युद्धातील शस्त्रांवर नियंत्रण मिळवण्यासाठी भाला आणि गदा प्रशिक्षण हा सराव केला जायचा.
काही मुघल शासकांना पोहण्याचीही आवड होती. तासन्तास ते पोहायचे आणि शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करायचे.