Anuradha Vipat
पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठ हिची ईडीने सोमवारी सात तास चौकशी केली.
त्यानंतर आजही (मंगळवार) तिला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत.
आता चौकशीदरम्यान गहनाने राज कुंद्राविषयी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
मुलाखतीत गहना म्हणाली, “मी नेहमी हेच सांगत आले आहे की मी कधीच राज कुंद्राशी थेट संवाद साधला नाही. उमेश कामतच्या माध्यमातूनच आमचा संवाद व्हायचा.
पुढे गहना म्हणाली, मिटींगसाठी आम्ही ज्याठिकाणी भेटायचो त्याच्या दारावर ‘वियान इंडस्ट्रीज’ असं नाव लिहिलेलं होतं.
पुढे गहना म्हणाली, आम्हाला तिथे राज कुंद्राच्या कुटुंबाचाही फोटो पाहायला मिळाला. त्यामुळे ते ऑफिस राज कुंद्राचं असावं असा माझा अंदाज आहे.
पुढे गहना म्हणाली, मी जानेवारी 2021 मध्ये पहिल्यांदा राजला भेटले होते. तेव्हा राज बॉलिफेम आणि जल्दीलाइफ हे दोन ॲप लाँच करणार होता.