Anuradha Vipat
अभिनेत्री नम्रता संभेराव सासूबाईचं कौतुक करताना पाहायला मिळाली आहे
अभिनेत्री नम्रता संभेराव नेहमी चर्चेत असते.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानं नम्रताला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
अलीकडेच नम्रताने एका युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिने सासूचं कौतुक केलं आहे
नम्रता म्हणाली की, माझ्या सासूशिवाय मी काहीच करू शकत नाही. माझ्या आयुष्यात सासू असल्यामुळे माझं काम सुरळीत पार पडतंय. सगळं व्यवस्थित चालू आहे
पुढे नम्रता म्हणाली की, आपण म्हणतो, दोन पायावर असल्यामुळे व्यवस्थित चालतो. एखाद्या पायाला जरी दुखापत झाली तरी प्रोब्लेम होतो.
पुढे नम्रता म्हणाली की,तसंच माझी सासू माझा एक पाय आहे आणि माझा स्वतःचा दुसरा पाय आहे.