Aarti Badade
ताडगोळा (बर्फाचे सफरचंद) शरीराला आतून थंड ठेवतो आणि उष्माघातापासून संरक्षण करतो.
या फळामध्ये भरपूर पाणी असते – त्यामुळे शरीराची हायड्रेशन पातळी उत्तम राहते.
ताडगोल्यामध्ये नैसर्गिक साखर असते जी थकवा दूर करून झपाट्याने ऊर्जा देते.
हे फळ पचायला सोपं आहे. बद्धकोष्ठता, आम्लता, आणि गॅससारख्या त्रासांवर आराम मिळतो.
ताडगोळा त्वचेला पोषण देतो, मुरुमं व पुरळ कमी करतो आणि चमकदार बनवतो.
या फळात कॅलरीज कमी असल्याने वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे.
नेहमी ताजं आणि कच्चं ताडगोळा खा. जास्त पिकलेले किंवा फार प्रमाणात खाणं टाळा.
स्वाद, थंडावा आणि आरोग्य फायदे एकत्र असलेलं हे फळ उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम आहे!