बाळकृष्ण मधाळे
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मधून ग्रेटर नोएडा येथील गलगोटियास विद्यापीठाला वगळण्यात आल्याने मोठी चर्चा रंगलीये. विद्यापीठाने प्रदर्शनात 'ओरियन' नावाचा रोबोटिक कुत्रा सादर केल्यानंतर वाद उफाळून आला.
Galgotias University AI Summit Controversy
esakal
समिटदरम्यान विद्यापीठाच्या स्टॉलवर 'ओरियन' नावाने प्रदर्शित करण्यात आलेला रोबोट प्रत्यक्षात चिनी कंपनीने तयार केलेला असल्याचा आरोप करण्यात आला.
Galgotias University AI Summit Controversy
esakal
हा रोबोट Unitree Robotics या कंपनीने विकसित केला असून भारतात त्याची किंमत अंदाजे २ ते ३ लाख रुपये आहे. विद्यापीठाने सुरुवातीला हा रोबोट त्यांच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने विकसित केल्याचा दावा केला होता.
Galgotias University AI Summit Controversy
esakal
विद्यापीठातील प्राध्यापिका नेहा सिंग यांनी डीडी न्यूजशी बोलताना सांगितले होते की, विद्यापीठाने एआय क्षेत्रात ३५० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आणि कॅम्पसमध्ये स्वतंत्र एआय विंग कार्यरत आहे. मात्र, नंतर त्यांनी स्पष्ट केले की संवादात गैरसमज झाल्याने हा वाद निर्माण झाला.
Galgotias University AI Summit Controversy
esakal
सुनील गलगोटिया हे गलगोटियास विद्यापीठाचे संस्थापक आणि मालक आहेत. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे त्यांनी या शिक्षणसंस्थेची पायाभरणी केली. सध्या विद्यापीठाची धुरा त्यांचे पुत्र डॉ. ध्रुव गलगोटिया सांभाळत आहेत.
Galgotias University AI Summit Controversy
esakal
सुनील गलगोटिया यांनी दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स येथून शिक्षण घेतले. १९८० च्या दशकात त्यांनी प्रकाशन व्यवसायात पाऊल ठेवले आणि ‘गलगोटियास पब्लिकेशन्स’ची स्थापना केली. त्यांनी Barron’s च्या SAT, TOEFL, GRE आणि GMAT सारख्या पुस्तकांचे वितरण हक्क मिळवले.
Galgotias University AI Summit Controversy
esakal
२००० साली त्यांनी ‘गलगोटियास इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी’ (GIMT) ची केवळ ४० विद्यार्थ्यांसह सुरुवात केली. त्याच वर्षी ‘गलगोटियास कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ची स्थापना झाली. २०११ मध्ये उत्तर प्रदेश सरकारकडून संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला.
Galgotias University AI Summit Controversy
esakal
अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या सुनील गलगोटिया यांनी आपली कारकीर्द मोठ्या संघर्षातून उभी केली. पहिलं पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी सुमारे ९,००० रुपये कर्ज घेतल्याचे सांगितले जाते.
Galgotias University AI Summit Controversy
esakal
आज विविध मीडिया अहवालांनुसार, त्यांच्या शैक्षणिक साम्राज्याची एकूण किंमत सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे म्हटले जाते.
Galgotias University AI Summit Controversy
esakal
चिनी रोबोट प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादामुळे सध्या गलगोटियास विद्यापीठ आणि त्यांचे व्यवस्थापन चर्चेत आले आहे.
Galgotias University AI Summit Controversy
esakal
Titvi Bird Eggs Myth
esakal