बाळकृष्ण मधाळे
लोकांना कष्टापेक्षा झटपट यश आणि संपत्ती हवी असते. त्यामुळे खजिना, चमत्कार किंवा अद्भुत वस्तूंच्या कथा आजही लोकांमध्ये आकर्षण निर्माण करतात. अशाच एका लोककथेमुळे टिटवी पक्षी आणि तिची अंडी चर्चेत असतात.
Titvi Bird Eggs Myth
esakal
बुंदेलखंड भागात प्रचलित असलेल्या कथेनुसार, टिटवी पक्षी हिमालयातून पारस दगड घेऊन येते आणि त्याच दगडाच्या साहाय्याने आपली अंडी फोडते, अशी समजूत आहे. या कथेमुळे अनेक जण टिटवीच्या अंड्यांभोवती गूढतेचं वलय तयार करतात.
Titvi Bird Eggs Myth
esakal
लोककथांमध्ये पारस दगड हा असा चमत्कारिक दगड मानला जातो की, तो लोखंडाला स्पर्श करताच सोन्यात रूपांतरित करतो. मात्र, अशा दगडाच्या अस्तित्वाचा कोणताही शास्त्रीय पुरावा आजवर सापडलेला नाही.
Titvi Bird Eggs Myth
esakal
टिटवी पक्ष्याचा प्रजनन काळ साधारणपणे मार्च ते जून या दरम्यान असतो. या काळात ती दोन ते पाच अंडी घालते.
Titvi Bird Eggs Myth
esakal
टिटवी झाडांवर घरटे बांधत नाही. ती मोकळी जमीन, नदीकाठ, शेती किंवा सुरक्षित वाटणाऱ्या खुल्या जागेतच अंडी देते. तिच्या अंड्यांचा रंग जमिनीशी मिळताजुळता असल्याने ती सहज लपून राहतात.
Titvi Bird Eggs Myth
esakal
काही ठिकाणी अशी समजूत आहे की, टिटवी जितकी अंडी देते तितके महिने त्या वर्षी पाऊस पडतो. मात्र, यालाही कोणताही शास्त्रीय आधार नाही.
Titvi Bird Eggs Myth
esakal
उन्हाळ्याच्या काळात अनेक जण नदीकाठ, शेतात किंवा मोकळ्या जमिनीवर टिटवीची अंडी शोधताना दिसतात. कारण, अंडी फोडताना टिटवी पारस दगड वापरते आणि तो तिथेच राहतो, अशी त्यांची धारणा असते.
Titvi Bird Eggs Myth
esakal
अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यानंतर तो कथित दगड टिटवी तिथेच सोडून देते की पुन्हा सोबत घेऊन जाते, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या कथेबाबत अधिकच संभ्रम निर्माण होतो.
Titvi Bird Eggs Myth
esakal
वरील माहिती लोककथांवर आधारित असून तिचा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. आम्ही या कथांचा कोणताही दावा किंवा समर्थन करत नाही.
Titvi Bird Eggs Myth
esakal
Why Bats Hang Upside Down
esakal