Shubham Banubakode
गणेश भिकाजी देवळालीकर हे मराठी भाषिक वास्तुशास्त्रज्ञ होते, ज्यांनी दिल्लीतील अनेक प्रसिद्ध इमारतींचे डिझाईन तयार केले. ते देशाचे पहिले चीफ आर्किटेक्ट होते.
देवळालीकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचे डिझाईन तयार केले. यात त्यांनी इंडो-ब्रिटिश स्थापत्यशैलीचा सुंदर मेळ साधला. ही इमारत आजही भारतीय न्यायव्यवस्थेचे प्रतीक आहे.
लोटस टेंपलच्या डिझाईनमध्ये देवळालीकर यांचा मोलाचा वाटा होता. ईरानी वास्तुशास्त्रज्ञ फरीबोर्ज सहबा यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कमळाच्या फुलावर आधारित हे अनोखे डिझाईन तयार केले होतं.
अमेरिकेतील राजदूताचे निवासस्थान असलेल्या ‘रूजवेल्ट हाउस’चे डिझाईन देवळालीकर आणि वास्तुशास्त्रज्ञ एडवर्ड डुरेल स्टोन यांनी मिळून तयार केले होतं.
देवळालीकर यांनी दिल्लीतील सेंट जेवियर्स स्कूल आणि नजफगढ येथील कोला फॅक्टरी यांचेही डिझाईन तयार केले.
मराठी अस्मितेचा अभिमान बाळगणारे देवळालीकर हे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे CPWDमध्ये त्यांचा दबदबा होता.
1978 मध्ये देवळालीकर यांचे निधन झाले. त्यांनी दिल्लीच्या स्थापत्यकलेत मोलाचे योगदान दिले. पण त्यांचे नाव आजही बऱ्याच जणांना माहीत नाही.