सकाळ डिजिटल टीम
गणपतीला मोरया का म्हणतात काय आहे या मागचा इतीहास जाणून घ्या.
'मोरया' हे नाव १४ व्या शतकातील महान संत आणि गणपतीचे निस्सीम भक्त, मोरया गोसावी यांच्याशी जोडलेले आहे.
मोरया गोसावी हे पुण्याजवळील चिंचवड येथे राहत होते आणि त्यांनी तिथे गणपतीची उपासना केली.
मोरया गोसावी मूळचे मोरगावचे होते, जिथे अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे गणपती मंदिर 'मयूरेश्वर' आहे.
वृद्धापकाळामुळे मोरगावला जाणे शक्य नसताना गणपतीने त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितले की, तो स्वतः त्यांच्यासाठी चिंचवडला प्रकट होईल.
मोरया गोसावी यांनी चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली, त्यामुळे हे ठिकाण गणेशभक्तांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले.
मोरया गोसावींची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की त्यांचे नाव गणपतीच्या नावाशी कायमचे जोडले गेले. काही पौराणिक कथांनुसार, गणपतीचे वाहन मयूर (मोर) आहे. यामुळे गणपतीला 'मयूरेश्वर' असेही म्हणतात.
'मोरया' हा शब्द 'मयूरेश्वर' या नावाचा अपभ्रंश असावा असे मानले जाते .त्रेतायुगात गणपतीने मयूरेश्वराच्या रूपात अवतार घेतला होता आणि त्यांचा वाहन मोर होता. या अवतारात त्यांनी सिंदूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. असे म्हंटले जाते.
या सर्व कारणांमुळे 'गणपती बाप्पा' या शब्दापुढे 'मोरया' शब्द जोडला गेला आणि तो देशभरात लोकप्रिय झाला.