गणपतीचेच विसर्जन का होते? इतर देवांच्या मूर्तींचे का नाही? जाणून घ्या धार्मिक रहस्य

Yashwant Kshirsagar

केवळ देवता नाही

श्री गणेश बुद्धी, विवेक, एकाग्रता, संवेदनशीलता आणि पर्यावरणसंवर्धनाचा दिव्य संदेश आहेत. जन्म ते विसर्जन आणि पितृपक्षापर्यंतची परंपरा धर्म, विज्ञान आणि सृष्टीरक्षणाचा सुंदर समन्वय दाखवते.

Ganpati Visarjan 

|

esakal

गणेशजन्माची धार्मिक कथा

माता पार्वतीने माती/उटण्यापासून बालक घडवला. शिवाने मस्तक छेदले, नंतर हत्तीचे मस्तक जोडून पुनर्जीवित केले. “प्रत्येक शुभकार्याच्या सुरूवातीला गणेशपूजन” हे वरदान दिले.

Ganpati Visarjan 

|

esakal

आध्यात्मिक अर्थ

पार्वती = प्रकृती. मातीचा गणेश = प्रकृतीत प्रकट झालेले दिव्य चैतन्य. हत्तीचे मस्तक = सामान्य बुद्धीचे विवेकबुद्धीत रूपांतर, अहंकाराऐवजी शिस्त आणि संकटानंतर नवीन सुरुवात.

Ganpati Visarjan 

|

esakal

गणेश स्वरूपातील जीवनसंदेश

विशाल मस्तक → दूरदर्शी विचार मोठे कान → अधिक ऐका,सूक्ष्म डोळे → एकाग्रता,लहान मुख → वाणीवर संयम, सोंड → सामर्थ्य + कोमलता,एकदंत → एकाग्रता व त्याग,लंबोदर → अनुभवांचे पचन,मूषक → सूक्ष्म जागरूकता

Ganpati Visarjan 

|

esakal

गणेशपूजेमुळे बुद्धीचा विकास

मंत्रजप, आरती, ध्यान आणि सामूहिक प्रार्थना मनात शिस्त आणतात. एकाग्रता वाढते, मन शांत होते, कृतज्ञता येते आणि कुटुंब-समाजात एकता निर्माण होते अशी माहिती आध्यात्मिक संशोधक ध्यानगुरू रघुनाथ गुरुजी यांनी दिलीय.

Ganpati Visarjan 

|

esakal

गणेशोत्सव भाद्रपदातच का?

पावसाळ्याच्या उत्तरार्धात नद्या भरलेल्या, जमीन सुपीक, माती मूर्तीसाठी योग्य आणि निसर्ग हिरवागार असतो. माती-पाण्यापासून मूर्ती बनवणे म्हणजे पृथ्वी आणि जल या पंचमहाभूतांचे पूजन.

Ganpati Visarjan 

|

esakal

मूर्तीची स्थापना का?

नैसर्गिक माती-पाण्याची मूर्ती दहा दिवस मंत्र, पूजा, ध्यान, फुले, दिवा आणि अन्नदानाने संस्कारित होते. ती भक्तांसाठी पवित्र माती बनते आणि मनावर सकारात्मक परिणाम करते.

Ganpati Visarjan 

|

esakal

विसर्जन का केले जाते?

विसर्जन म्हणजे देव नष्ट करणे नाही. साकार रूप पुन्हा निसर्गात विलीन होते. बुद्धी, विवेक आणि संस्कार अंतःकरणात कायम राहतात. संदेश: आसक्ती सोडा, निसर्गाला परत द्या आणि गुण जीवनात धारण करा.

Ganpati Visarjan 

|

esakal

इतर देवांचे विसर्जन का नाही?

विसर्जन देवतेशी नव्हे, तर मूर्ती तात्पुरती आहे की कायमची याच्याशी संबंधित आहे. उत्सवासाठी तयार केलेल्या पार्थिव मूर्तींचे विसर्जन होते. कायमच्या धातू/दगडी किंवा प्राणप्रतिष्ठित मूर्तींचे होत नाही. दुर्गा, काली, सरस्वती इ. च्या तात्पुरत्या मूर्तींचेही विसर्जन होते.

Ganpati Visarjan 

|

esakal

पर्यावरणाचे रहस्य

प्राचीन काळात स्थानिक माती वापरली जायची. विसर्जनानंतर ती नदीच्या गाळात मिसळून पृथ्वीच्या चक्रात परत जाते. निसर्गातून घेतलेली माती शुद्ध स्वरूपात निसर्गाला परत देण्याचा हा सुंदर पर्यावरणीय संदेश आहे.

Ganpati Visarjan 

|

esakal

तोंडातून पिल्लांना जन्म देणारा एकमेव प्राणी! निसर्गाचा अजब चमत्कार माहित्येय?

Gastric Brooding Frog Facts

|

esakal

येथे क्लिक करा