तोंडातून पिल्लांना जन्म देणारा एकमेव प्राणी! निसर्गाचा अजब चमत्कार माहित्येय?

Yashwant Kshirsagar

पृथ्वीवरील अद्वितीय जीवन

पृथ्वीवर अब्जावधी जीवजंतू व वनस्पतींचे घर आहे. प्रत्येक सजीवामध्ये काही अद्वितीय वैशिष्ट्ये असतात आणि काही प्राणी बदलत्या पर्यावरणाशी सहज जुळून घेतात.

Gastric Brooding Frog Facts

|

esakal

तोंडावाटे जन्म देणारा प्राणी

काही प्राणी अंडी घालतात, तर काही थेट पिल्लांना जन्म देतात. असा एक प्राणी आहे जो आपल्या पिलांना तोंडावाटे जन्म देतो – ही माहिती अनेकांना माहीत नसते.

Gastric Brooding Frog Facts

|

esakal

प्रक्रिया उलटीसारखी

हा प्राणी पिल्लांना जन्म देण्यासाठी तोंडाचा वापर करतो. ही प्रक्रिया एखाद्याला उलटी झाल्यासारखी वाटते, पण निसर्गातील ही एक रंजक बाब आहे.

Gastric Brooding Frog Facts

|

esakal

बेडूक

हे प्राणी अनेकदा आपल्या आसपासच आढळतात. विशेषतः पावसाळ्यात ते खूप आवाज करतात. आपण एका विशिष्ट प्रकारच्या बेडकाबद्दल बोलत आहोत.

Gastric Brooding Frog Facts

|

esakal

गॅस्ट्रिक-ब्रूडिंग फ्रॉग

‘गॅस्ट्रिक-ब्रूडिंग फ्रॉग’ (Gastric-brooding frog) या बेडकाची प्रजनन पद्धत खरोखरच अद्वितीय आहे. हा बेडूक आपली अंडी उबवण्यासाठी स्वतःच्या तोंडाचा वापर करतो.

Gastric Brooding Frog Facts

|

esakal

अंडी गिळण्याची पद्धत

अंडी घातल्यानंतर बेडूक ती गिळून टाकतो. अंड्यांवरील विशेष रासायनिक आवरण त्यांना पोटातील आम्लापासून (गॅस्ट्रिक ॲसिड) संरक्षण देते.

Gastric Brooding Frog Facts

|

esakal

पोटात उबवणे आणि जन्म

अंडी उबून पिल्ले बाहेर येईपर्यंत ती पोटाच्या आतच राहतात. नंतर ही पिल्ले बेडकाच्या तोंडावाटे बाहेर येतात. एका वेळी २५ पर्यंत पिल्लांना जन्म देऊ शकतो.

Gastric Brooding Frog Facts

|

esakal

नामशेष झालेली प्रजाती

१९८० च्या दशकाच्या मध्यात ही प्रजाती नामशेष झाली. पूर्वी ते फक्त ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील एका लहान भागात आढळत असत.

Gastric Brooding Frog Facts

|

esakal

एकमेव असा बेडूक

‘गॅस्ट्रिक-ब्रूडिंग फ्रॉग’ हा असा एकमेव बेडूक आहे जो तोंडावाटे पिल्लांना जन्म देतो. निसर्गातील ही अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक प्रक्रिया आहे.

Gastric Brooding Frog Facts

|

esakal

पुनरुज्जीवनाचे प्रयत्न

सध्या शास्त्रज्ञ या प्रजातीला पुन्हा जिवंत करण्याच्या प्रयत्नात संशोधन करत आहेत. निसर्गातील ही अनोखी देणगी पुन्हा पाहण्याची आशा कायम आहे.

Gastric Brooding Frog Facts

|

esakal

दुधाचा चहा प्यायल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात? पिण्याआधी जाणून घ्या

Milk Tea Health Risks

|

esakal

येथे क्लिक करा