Monika Shinde
आळीव म्हणजे हलीम बिया हे लालसर रंगाचे छोटे बीज असून ते एक पॉवरफुल सुपरफूड आहे. जर तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी याचे सेवन केले, तर तुमच्या आरोग्यात लक्षणीय बदल दिसून येतील. चला तर मग, याचे फायदे जाणून घेऊया
आळीवमध्ये फायबर भरपूर असते. रोज सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, गॅस, अपचन यावर नियंत्रण मिळवता येतं.
आळीवमध्ये हेल्दी फॅट्स असतात. हे कोलेस्टेरॉल नियंत्रित करतं आणि हृदय विकाराचा धोका कमी करतं.
अँटीऑक्सिडंट्स आणि ‘ई’ जीवनसत्त्वामुळे त्वचा निरोगी, मृदू व चमकदार दिसते. नैसर्गिक ग्लो मिळतो.
फायबर आणि हेल्दी फॅट्स मुळे पोट भरलेलं वाटतं. त्यामुळे अति खाणं टाळता येतं आणि वजन नियंत्रणात राहतं.
आळीवमधील ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि मन:शांती वाढीस लागते
आळीव अँटी-इन्फ्लेमेटरी घटकांनी भरलेलं आहे. सांधेदुखी, स्नायूंची सूज कमी करण्यास मदत करते.
रोज २ वेळा आळीव आहारात घ्या. ७ दिवसांतच आरोग्यात सकारात्मक बदल जाणवा! नैसर्गिक मार्गाने निरोगी बना.