Anuradha Vipat
स्टार प्रवाहवरनुकत्याच सुरु झालेल्या 'थोडं तुझ आणि थोडं माझं' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
आता लवकरच मालिकेत दिवंगत अभिनेते निळु फुले यांच्या कन्या गार्गी फुले यांची एण्ट्री होणार आहे.
रजनी सरपोतदार असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे.
रजनी सरपोतदार खानदानी श्रीमंत आहे. पतीच्या निधनानंतर न खचता तिने खानदानी व्यवसायाचा डोलारा सांभाळला.
रणजीत प्रमाणेच आपल्या आज्ञेत राहणारी सूनच आपल्या घरी यावी असं तिला वाटतं असंत .
थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतून शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडत आहे