संतोष कानडे
गढकुंडार हा किल्ला अशा मोजक्या किल्ल्यांपैकी एक आहे, ज्याची रचना शत्रूला चकवा देण्यासाठी अत्यंत हुशारीने आणि रहस्यमय पद्धतीने करण्यात आली आहे.
हा किल्ला एका टेकडीवर अशा प्रकारे बांधला आहे की, तो १२ ते १३ किलोमीटर दूरवरून स्पष्ट दिसतो; पण जसजसे तुम्ही याच्या जवळ जाता, तसा हा नजरेतून गायब होतो.
किल्ल्याकडे जाणारा जो मुख्य रस्ता दूरवरून दिसतो, त्या रस्त्याने पुढे गेल्यास तो किल्ल्याऐवजी भलतीकडेच घेऊन जातो आणि किल्ल्याचा खरा रस्ता बाजूलाच राहतो.
शत्रूने अचानक हल्ला केल्यास त्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार सापडू नये आणि त्याची दिशाभूल व्हावी, हाच हा किल्ला रात्रीच्या वेळी किंवा अंधारात गायब वाटण्यामागचा खरा वैज्ञानिक हेतू आहे.
हा किल्ला एकूण पाच मजली असून, यातील दोन मजले जमिनीच्या खाली बांधण्यात आले आहेत, जे पूर्णपणे अंधारात राहतात.
या किल्ल्यामध्ये असणारी गुप्त भुयारे आणि चक्रव्यूहासारख्या रचनेमुळे रात्रीच्या वेळी येथे जाण्यास प्रशासनाकडून कडक बंदी घालण्यात आली आहे.
रात्रीच्या अंधारात आजूबाजूच्या टेकड्यांमुळे आणि झाडीमुळे किल्ल्याचा अचूक अंदाज लागत नाही, म्हणूनच स्थानिक लोक याला 'रात्री गायब होणारा किल्ला' असे म्हणतात.
हा किल्ला ११ व्या शतकातील चंदेल आणि खंगार राजांच्या काळातील स्थापत्यकलेचा आणि सुरक्षा यंत्रणेचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो.
या किल्ल्याच्या तळघरात अनेक गुप्त खजिने आणि विहिरी असल्याचे सांगितले जाते, ज्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक संशोधकांनी केला आहे.
बुंदेलखंडमधील हा रहस्यमय 'गढकुंडार किल्ला' उत्तर प्रदेशात झाशीपासून साधारण ७० किलोमीटर अंतरावर, टिकमगड जिल्ह्यात एका उंच टेकडीवर स्थित आहे.