Sandeep Shirguppe
लसूण आणि गूळ आयुर्वेदात आरोग्यासाठी उत्तम मानले जातात. हृदय आणि रक्तवाढीसाठी या दोन्हींचा जास्त फायदा होतो.
लसूण आणि गुळात अँटीऑक्सिडंट्स असल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
आपली चयापचय आणि चरबी जाळण्यास लसूण आणि गुळाचा उपयोग होतो यामुळे वजन वाढीवर नियंत्रण मिळते.
लसणाचे एलिसिन नावाचे तत्व बॅड कोलेस्ट्रॉलच्या ऑक्सिडेशनला रोखते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्याने रक्त पातळ होते, ज्यामुळे हृदयविकार आणि इतर समस्यांचा धोका कमी होतो.
कच्चा लसूण आणि गूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, गॅस आणि ॲसिडिटीसारख्या समस्या दूर होतात.
गूळ लोह आणि इतर खनिजांनी समृद्ध असतो, ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.
गूळ आणि लसूण फॉस्फरस, झिंक, पोटॅशिअम, मॅग्नेशिअमसारखे खनिज असतात.