Pranali Kodre
अतिशय उग्र वासाचा लसूण भाज्या उसळी-डाळी-मांसाहार इत्यादींना अतिशय हवाहवासा स्वाद देतो.
ॲलिअम सॅटिवम हे शास्त्रीय नाव असलेला लसूण मुळातच थोडा उष्ण गुणधर्माचा असल्यानं वातनाशक व कफनाशक आहे.
पित्ताचा त्रास वा पित्तप्रकृती असणाऱ्यांनीही जरूर याचा वापर करावा. मात्र, प्रमाणातच.
लसूण खाता येतो व बाह्योपचारासाठीही वापरता येतो. अनेक आयुर्वेदिक औषधांत याचा वापर केला जातो.
लसणामध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ई’ जीवनसत्त्वे, लोह, जस्त, कॅल्शिअम, मॅंगेनीज, सोडिअम, ऑलिसिन, तेलीय पदार्थ, तंतुमय पदार्थ इत्यादी उपयुक्त तत्त्वे असतात.
लसणाच्या मोठ्या दहा-बारा पाकळ्या ठेचून शंभर मिलिलिटर तेलात उकळून तेल गाळून ठेवावे. त्याने मालिश करावी. सकाळी एक पाकळी गरम पाण्यासोबत घेतल्याने सांधेदुखी कमी होते.
लसणाची छोटी पाकळी कापसात गुंडाळून कानात ठेवल्यास कानदुखी कमी होते. ४–५ दिवस हा उपाय करावा. लसणाच्या पाण्याने गार्गलही करता येते.
जेवणात लसूण घालावा. विशेषतः पचनास जड पदार्थ – उसळी, चणे, मांसाहार – यामध्ये लसूण वापरावा. लसणाच्या गोळ्या जेवणानंतर उपयुक्त.
लसूण पचन सुधारतो, गॅसेस कमी करतो आणि छातीत दाब येणे व श्वास घेण्याचा त्रास टाळतो. प्रमाणात वापरल्यास आरोग्यासाठी अमृतासमान.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.