Aarti Badade
लसूण खाल्ल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता कमी होते.
लसूण मर्यादित प्रमाणातच खा, कारण जास्त सेवन केल्यास पोटात जळजळ किंवा गॅस होऊ शकतो.
लसूण सोललेला असो की न सोललेला, त्यात फायबर असतो. फायबर वजन नियंत्रित ठेवतो व वजन वाढत नाही. लसूण सालीसह खाल्ल्याने अधिक फायदे मिळू शकतात.
लसूण सालीसह खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि पदार्थ आणखी चवदार होतात. लसूण सालीसह खाणे अधिक फायदेशीर ठरते.
लसूण खाल्ल्याने रक्तवाहिन्या विस्तारित होतात, ज्यामुळे ऑक्सिजनचा प्रवाह सुधरतो. प्रदूषित शहरांमध्ये राहणारे, मॅरेथॉन धावपटू आणि ट्रेकर्स लसूण मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो.
लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो. त्यातील अँटीऑक्सिडंट्स रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात.हृदयरोगाच्या धोका कमी होतो.
लसूण पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळवते.
डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही सुरवात करू नका.