सकाळ डिजिटल टीम
प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कधी ना कधी प्रवास केला आहे. पण, कधी तुम्ही विचार केला आहे का की, ट्रेन रात्रीच्या वेळी दिवसभरापेक्षा जास्त वेगाने का धावतात?
रात्री ट्रेनला कमी सिग्नल मिळतात, ज्यामुळे ट्रेनला अधिक सुरळीत धावण्याचा आणि वारंवार थांबावे लागत नाही.
दिवसा ट्रेन जास्त स्थानकांवर थांबतात, विशेषतः स्थानिक प्रवाशांसाठी. पण रात्रीच्या ट्रेन विविध लहान स्थानकांना वगळतात. ज्यामुळे अधिक वेगाने पोहोचतात.
दिवसा रेल्वे ट्रॅफिक खूप जास्त असतो, ज्यामुळे ट्रेन अधिक वेळ थांबतात. पण रात्री फक्त कमी ट्रेन धावत असल्याने, प्रवास जास्त सुरळीत आणि अखंड होतो.
रात्रीच्या वेळी ट्रेनची कमीत कमी देखभाल केली जाते त्यामुळे ट्रेन अधिक वेगाने आणि चांगल्या प्रकारे धावतात.
रात्रीचे तापमान कमी असण्यामुळे ट्रॅकवरील घर्षण कमी होते, ज्यामुळे ट्रेन अधिक वेगाने धावू शकतात.
रात्रीच्या वेळी ट्रॅकवर लोकांची आणि प्राण्यांची संख्या खूपच कमी असते. त्यामुळे जास्त लक्ष द्यावे लागत नाही.