इंग्रजांनी 'या' राजांना भारताबाहेर हाकलून दिलं होतं

संतोष कानडे

ब्रिटिश

भारतावर ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांनी देशातील अनेक संस्थानं खालसा केली. काही राजांना तर त्यांनी भारताबाहेर हाकलून लावलं.

सक्रिय

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे ब्रिटिशांनी मुघल सम्राट बाहदूर शाह जफर याला दोषी ठरवले.

ब्रह्मदेश

बाहदूर शाहला भारताबाहेर ब्रह्मदेश (म्यानमार) मधील रंगून (यंगून) येथे हद्दपार करण्यात आले. १८६२ मध्ये तिथेच त्याचा मृत्यू झाला.

रणजित सिंग

महाराजा रणजित सिंग यांचे पुत्र दलीप सिंग यांना वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी ब्रिटिशांनी गादीवरून पायउतार केले आणि त्यांना इंग्लंडला पाठवून दिले.

धर्मांतर

पुढे दलीप सिंह यांचं धर्मांतर करण्यात आलं आणि त्यांना आयुष्यभर भारतापासून दूर राहावे लागले.

शिवगंगा संस्थान

१८०१ मध्ये ब्रिटिशांनी शिवगंगा संस्थानाचे राजे वेंगाई पेरिया उदयाना देवर यांना देशाबाहेर हद्दपार केले होते. अनेक इतिहासकारांच्या मते, अशी कारवाई झालेले ते पहिले भारतीय राजा होते.

इंडोनेशिया

वेंगाई पेरिया उदयाना देवर यांना त्यांच्या ७२ साथीदारांसह सुमात्रा (इंडोनेशिया) मधील पेनांग येथे पाठवण्यात आले होते.

बंदिवान

जसे भारतीय राजांना बाहेर पाठवले, तसेच ब्रिटिशांनी परदेशी राजांना भारतातही बंदिवान करून ठेवले होते.

रत्नागिरी

थिबा मिनी हे ब्रह्मदेशाचे शेवटचे राजे होते. ब्रिटिशांनी या राजाला पदच्युत करून महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे हद्दपार केले होते.

थिबा पॅलेस

रत्नागिरी येथे त्यांचा 'थिबा पॅलेस' आजही अस्तित्वात आहे. ब्रिटिशांनी अनेक राजांचा क्रूरपणे छळ केल्याच्या नोंदी आहेत.

खामेनेई यांचं भारतातील या गावाशी आहे खास कनेक्शन

<strong>येथे क्लिक करा</strong>