सावधान! 'या' चुकांमुळे होऊ शकतो गॅस सिलेंडरचा स्फोट; आजच सावध व्हा

सकाळ डिजिटल टीम

सिलेंडरचा स्फोट

गॅस सिलेंडरचा स्फोट होण्यामागची मुख्य कारणं कोणती आहेत जाणून घ्या.

Gas cylinder explosion

|

sakal 

एक्सपायरी डेट

सिलेंडरची एक्सपायरी डेट तपासा प्रत्येक सिलेंडरच्या वरच्या पट्टीवर 'A', 'B', 'C',किंवा 'D' आणि त्यानंतर दोन अंकी वर्ष (उदा. B-26) लिहिलेले असते. ही सिलेंडरची एक्सपायरी डेट असते. मुदत संपलेला सिलेंडर कधीही घेऊ नका, कारण त्याचा धातू कमकुवत झालेला असू शकतो.

Gas cylinder explosion

|

sakal 

गॅसचा वास

गॅस गळतीचा वास आल्यास वीज बटणे सुरू करू नका जर घरामध्ये गॅसचा वास येत असेल, तर चुकूनही लाइट, फॅन किंवा घराचे कोणतेही इलेक्ट्रिक स्विच सुरू किंवा बंद करू नका. स्विचमधील लहानशा ठिणगीमुळे (Spark) गॅसचा स्फोट होऊ शकतो.

Gas cylinder explosion

|

sakal 

एलपीजी गॅस

गळती जाणवल्यास सर्वप्रथम घरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडा, जेणेकरून साचलेला गॅस बाहेर निघून जाईल. एलपीजी गॅस हवेपेक्षा जड असल्याने तो जमिनीलगत साचतो, त्यामुळे हवा खेळती असणे आवश्यक आहे.

Gas cylinder explosion

|

sakal 

रेग्युलेटर

रात्री झोपताना किंवा घराबाहेर जाताना सिलेंडरचे रेग्युलेटर न विसरता बंद करा. केवळ गॅस शेगडीचा नॉब बंद करणे पुरेसे नसते.

Gas cylinder explosion

|

sakal 

ज्वलनशील पदार्थ

गॅस शेगडीच्या जवळ प्लास्टिकचे डबे, कपडे, रॉकेल किंवा सॅनिटायझर यांसारखे लवकर पेट घेणारे पदार्थ कधीही ठेवू नका.

Gas cylinder explosion

|

sakal 

सिलेंडरचा व्हॉल्व्ह

गरम पाणी किंवा कपड्याचा वापर टाळा सिलेंडरचा व्हॉल्व्ह जाम झाल्यास त्यावर गरम पाणी टाकणे किंवा त्याला गरम कपड्याने गुंडाळणे असे प्रयोग करू नका. यामुळे सिलेंडरमधील वायूचा दाब (Pressure) अनपेक्षितपणे वाढून स्फोट होऊ शकतो.

Gas cylinder explosion

|

sakal 

सर्व्हिसिंग

तुमची गॅस शेगडी, पाईप आणि रेग्युलेटर यांची अधिकृत गॅस एजन्सीच्या मेकॅनिककडून दर सहा महिन्यांनी तपासणी करून घ्या. पाईपला कुठेही भेगा (Cracks) नसल्याची खात्री करा.

Gas cylinder explosion

|

sakal 

जगात सर्वाधिक सोनं कोणत्या देशाकडे? भारताकडे किती?

Why gold reserves matter for economies

|

esakal

येथे क्लिक करा