Anushka Tapshalkar
श्रावण सुरू होण्याआधीचा शेवटचा रविवार किंवा अमावस्या म्हणजे गटारी! या दिवशी नॉनव्हेज प्रेमींसाना खास झणझणीत मटण डिश हव्याच असतात.
अशातच विदर्भाची सावजी मटण रेसिपी म्हणजे पर्वणीच ठरते. तुम्हालाही यंदा गटारीला नागपूर स्पेशल सावजी मटण खायचं असेल तर पुढे दिलेली सोपी रेसिपी लगेच लिहून घ्या.
१ किलो ताजे मटण, ४ वाट्या सावजी रस्सा, १ वाटी आले-लसूण-कोथिंबीर-हिरवी मिरचीचे वाटण, २ वाट्या आंबट दही, अर्धा चमचा खडा मसाला, कसुरी मेथी, कोथिंबीर, मीठ.
मटण स्वच्छ धुऊन घ्या. त्यात आले-लसूण वाटण, दही, मसाले, मीठ एकत्र करून दीड ते दोन तास ठेवा.
मटण मॅरिनेशनमधून पाणी सोडते, त्याच पाण्यात मटन हळूहळू शिजवा.
मटण अर्धवट शिजल्यानंतर त्यात ४ वाट्या सावजी रस्सा घालावा.
कसुरी मेथी घालून पुन्हा ५-७ मिनिटं मंद आचेवर शिजवा.
गॅस बंद केल्यावर वरून ताजी कोथिंबीर घालावी. यामुळे सुगंध आणि चव वाढते.
गरमागरम भाकरी किंवा तांदळाच्या भातासोबत झणझणीत सावजी मटन सर्व्ह करा.