सकाळ वृत्तसेवा
पूर्वीच्या काळी वेश्यांकडे केवळ शरीराचा सौदा करणाऱ्या महिला म्हणून बघितलं जात नव्हतं. त्यांना समाजाकडून मान-सन्मान मिळायचा.
वेश्यांना संगीत, नृत्य, भाषा, नजाकती शिकवल्या जात होत्या. कारण त्या धनिकांना खूश ठेवण्याचं काम करायच्या.
तेव्हाची सगळ्यात महागडी तवायफ होती गौहर खान. त्यांना हिंदी सिनेमातली पहिली रिकॉर्डिस्ट म्हणून ओळखलं जातं.
गौहर खानचं पहिलं गाणं २ नोव्हेंबर १९०२ मध्ये रेकॉर्ड झालं होतं. त्यांना साधारण २० भाषा येत होत्या.
हिंदुस्थानी, गुजराती, बंगाली, मराठी, अरबी, फारसी या भाषा गौहर यांना अवगत होत्या.
गौहर खान यांनी १३ वर्षांची असताना बलात्काराच्या वेदना सहन केल्या होत्या. लहानपणी त्यांना आई-वडिलांचं प्रेम मिळालं नव्हतं.
पुढे त्यांनी सांगीतिक क्षेत्रात प्रवेश केला आणि आपलं नाव कमावलं.
गौहर जान करोडपती तवायफ होत्या. त्यांचा मान मोठा होता. मेजवाणीमध्ये बोलावल्यानंतर त्यांना शंभर सोन्याची नाणी दिली जात असत.
गौहर जान भलेही एक वेश्या होत्या पण एकदा महात्मा गांधींनाही त्यांच्याकडून मदत मागावी लागली होती.
महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेवरुन माघारी आले तेव्हा त्यांना ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी स्वराज निधीची सुरुवात केली.
१९१० मध्ये गौहर जान यांची कमाई आजच्या १ कोटी रुपयांएवढी होती. गांधीजींच्या म्हणण्यावर त्यांनी आर्थिक मदतीची तयारी दर्शविली.
आर्थिक मदतीसाठी गौहर जान यांनी एक अट घातली होती. गांधीजींना त्यांचा परफॉर्मन्स बघायला यावं लागेल, ही ती अट.
परंतु गांधीजी तिथे गेलेच नाहीत. आपल्याऐवजी त्यांनी शौकत अली यांना पाठवलं.
त्यामुळे गौहर जान नाराज झाल्या. त्यांनी जी बोली केली होती, त्यातली केवळ अर्धीच रक्कम देऊ केली.