Monika Shinde
'ये गं ये गौराबाई!' अशा गजरात गौराईचं घराघरात थाटात आगमन. सोनपावलांनी आलेल्या माहेरवाशिणीचं औक्षण, फुलांची सजावट आणि प्रेमळ पाहुणचार!
गौराई म्हणजे महालक्ष्मी देवीचं रूप. महाराष्ट्रात तिला गणपतीची आई, बहीण किंवा पत्नी मानलं जातं. श्रद्धा आणि प्रेमाने भाविक तिचं पूजन करतात.
आज ३१ ऑगस्ट, ज्येष्ठा नक्षत्रावर, गौराईचं घराघरांत भक्तीभावाने थाटात आगमन झालं.
सुहासिनींनी साडी-चोळी नेसून गौराईचं पूजन करताना हळद-कुंकवाचं औक्षण, फुले, फळं आणि दागिन्यांनी गौराईला सजवलं जातं.
गौरीची प्रतिष्ठापना झाल्यावर पहिल्या दिवशी भाकरी, अंबाडा किंवा शेपू भाजीचा नैवेद्य दिला जातो. दुसऱ्या दिवशी पुरणपोळी, भाजी, खीर, लाडू आणि पंचपक्वान्न अर्पण करून श्रद्धेने पूजा केली जाते.
गौराई पूजन हा सण स्त्रियांसाठी खास असतो. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात ओव्या म्हणत गोड बोलणं, एकोप्याचं बंधन आणि सौंदर्य खुलवत साजरा होतो.
‘आली गं गौराई’, ‘ये गं गौराबाई’ अशा पारंपरिक गाण्यांमधून साजरी होते भक्ती. घरात पूजेमुळे सकारात्मक ऊर्जा आणि समाधानाचं वातावरण निर्माण होतं.
गौराईच्या तीन दिवसांच्या पाहुणचारानंतर तिचा निरोप देताना घरातील वातावरण भावुक होतं. 'पुन्हा लवकर या' असा प्रेमळ निरोप देत भाविक तिच्या कृपेची प्रार्थना करतात