Monika Shinde
मनोज जरंगे यांना ‘मराठ्याचा योद्धा’ म्हणून ओळखले जाते. आणि आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आले आहेत
मनोज जरांगे पाटील गेल्या १५ वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी झगडत आहेत आणि अनेक आंदोलनांना नेतृत्व दिले आहे.
मनोज जरांगे यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मातोरी हे गाव आहे. हे गाव त्यांच्या कुटुंबाचे जन्मस्थान आहे.
मनोज जरांगे सध्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे राहतात. तेथे त्यांचे वास्तव्य आहे आणि त्यांनी तेथे अनेक कार्य केले आहेत.
मनोज जरांगे यांचा जन्म १ ऑगस्ट १९८२ रोजी झाला असून, ते सध्या ४३ वर्षांचे आहेत.
जरांगे पाटील यांची पत्नी सौमित्रा पाटील, एक मुलगा आणि तीन मुली अशा चार सदस्यांचा कुटुंब आहे.