क्रश...प्रपोज....अन् स्माईल; गंभीरच्या इन्स्टा पोस्टनं विषयच संपवला!

प्रणाली कोद्रे

चाहते अन् खेळाडू

चाहते आणि खेळाडू यांचं नातं वेगळंच असतं. आपल्या आवडत्या खेळाडूसाठी चाहते अनेकदा अनोख्या गोष्टी करत लक्ष वेधतात.

KKR Fans | X/KKRiders

विनंती

बऱ्याचदा चाहते खेळाडूंचे लक्ष वेधणारे पोस्टर्सही सामन्यादरम्यान घेऊन येतात. कधीकझी या पोस्टरमधून एखादी विनंतीही केलेली असते.

KKR Fans | X/KKRiders

गौतम गंभीर

अशीच घटना आता भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरबरोबर घडली आहे, ज्यावर गंभीनेही मजेशीर उत्तर दिलंय.

Gautam Gambhir | X/KKRiders

गौतमचा गंभीर मूड

खरंतर गौतम गंभीर नेहमीच थोड्या गंभीर मूडमध्ये असतो, त्यामुळे तो हसताना खूप कमी वेळा दिसतो.

Gautam Gambhir | Sakal

चाहतीची पोस्ट

अशातच कोलकाता नाईट रायडर्सच्या एका महिला चाहतीने एक पोस्टर हातात घेतलेला घेतलेला फोटो शेअर केला.

Gautam Gambhir | Sakal

चाहतीची विनंती

या पोस्टरवर लिहिले होते 'जोपर्यंत गंभीर हसणार नाही, तोपर्यंत मी माझ्या क्रशला मागणी घालणार नाही.'

Gautam Gambhir Fan | Instagram

गंभीरची भन्नाट प्रतिक्रिया

गंभीरने चाहतीचा पोस्टर हातात घेतलेला फोटो आणि त्याचा स्वत:चा हसतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की 'आता तू मागणी घालू शकते.'

Gautam Gambhir | KKR Fan | Instagram

चाहत्यांच्या कमेंट्स

दरम्यान, गंभीरच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत.

Gautam Gambhir | esakal

IPL 2024: दिल्लीच्या लखनौवरील विजयाने राजस्थानसाठी उघडले प्लेऑफचे दरवाजे

Sanju Samson | X/IPL