Pranali Kodre
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील नाते नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे.
काही वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये खेळताना हे दोघे मैदानावर भिडलेही होते. त्यानंतरही त्यांच्यात काहीवेळा भांडणं झाली आहेत.
पण आता गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असून त्याच्या मार्गदर्शनाखाली विराट खेळतानाही दिसतो.
बीसीसीआय अनेकदा त्यांचे रिल्सही सोशल मीडियावर शेअर करत असते. याबाबत आता गंभीरने भाष्य केले आहे.
विराट सोबतच्या नात्यावर एबीपी चॅनेलशी बोलताना गंभीर म्हणाला, 'आम्ही मित्र होतो, आहोच आणि यापुढेही राहू. बाकी मग मैदानात जेव्हा आपण वेगवेगळ्या संघांसाठी खेळतो, तेव्हा संघाला पुढे नेण्यासाठी लढण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. '
तो पुढे म्हणाला, पण मैदानाबाहेर तुमचं नातं कसं आहे, हे लोकांना माहित असणं गरजेचं नाही आणि ते माहितीही होणार नाही. बाकी गोष्टी फक्त टीआरपीसाठी असतात.
याशिवाय गंमतीने तो असंही म्हणाला की बीसीसीआयला मी सांगेल आमचे खूप रिल नका टाकू. कारण ते लोकांना आवडत नाहीये.