Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने ८ मार्च रोजी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकली.
Team India
Sakal
अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत केलं आणि तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरलं.
Team India
Sakal
तीन टी२० वर्ल्ड कप आणि मायदेशात टी२० वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ पहिलाच संघ ठरला.
Team India
Sakal
पण यासोबतच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर बाबत एक खास आकडेवारी समोर आली आहे.
Gautam Gambhir
Sakal
गौतम गंभीर खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून कधीही आयसीसी स्पर्धेतील उपांत्य सामना आणि अंतिम सामना पराभूत झालेलं नाही.
Gautam Gambhir
Sakal
म्हणजेच गंभीर आयसीसी स्पर्धेतील ज्या उपांत्य आणि अंतिम सामन्याचा भाग होता, त्या सर्व स्पर्धा भारताने जिंकल्या आहेत.
Gautam Gambhir
Sakal
त्याने खेळाडू म्हणून २००७ चा टी२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य सामना किंवा अंतिम सामना खेळला, ज्यात भारताने विजय मिळवला होता.
Gautam Gambhir
Sakal
त्यानंतर भारतीय संघाने त्याच्या प्रशिक्षणाखाली २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीतील आणि २०२६ टी२० वर्ल्ड कप ट्ऱॉफीतील उपांत्य आणि अंतिम सामना खेळला. या दोन्ही स्पर्धेत भारतीय संघ विजेता ठरला.
Gautam Gambhir
Sakal
Suryakumar Yadav
Sakal