Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड संघात अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने नेतृत्व सूर्यकुमार यादवने केले.
Suryakumar Yadav
Sakal
त्यामुळे आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा सूर्यकुमार आठवा भारतीय कर्णधार ठरला.
Suryakumar Yadav
Sakal
एमएस धोनीने कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमध्ये चार अंतिम सामने खेळले, ज्यात २००७ आणि २०१४ टी२० वर्ल्ड कपचा समावेश आहे, तर २०११ वनडे वर्ल्ड कप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेता समावेश आहे. यातील २०१४ मध्ये फक्त विजय मिळवला नव्हता.
MS Dhoni
Sakal
रोहित शर्माने कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमध्ये चार अंतिम सामने खेळले, ज्यात २०२३ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, २०२३ वनडे वर्ल्ड कप, २०२४ टी२० वर्ल्ड कप आणि २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. त्याने टी२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
Rohit Sharma
Sakal
सौरव गांगुलीने कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमध्ये तीन अंतिम सामने खेळले, ज्यात २००० आणि २००२ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २००३ वनडे वर्ल्डकपचा समावेश आहे. यातील २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे संयुक्त विजेतेपद भारताने मिळवले होते.
Sourav Ganguly
Sakal
विराट कोहलीने कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमध्ये दोन अंतिम सामने खेळले, ज्यात २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा समावेश आहे. मात्र त्याला दोन्ही स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
Virat Kohli
Sakal
कपिल देव यांनी १९८३ वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताचे नेतृत्व करताना विजेतेपद जिंकले होते.
Kapil Dev
Sakal
मिताली राज हिने कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमध्ये दोन अंतिम सामने खेळले, ज्यात २००५ आणि २०१७ वनडे वर्ल्ड कपचा समावेश आहे, पण तिलाही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
Mithali Raj
Sakal
हरमनप्रीत कौने हिने कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमध्ये दोन अंतिम सामने खेळले, ज्यात २०२० टी२० वर्ल्ड कप आणि २०२५ वनडे वर्ल्ड कपचा समावेश आहे. यातील २०२५ वनडे वर्ल्ड कपचे विजेतेपद भारताने जिंकले.
Harmanpreet Kaur
Sakal
Sanju Samson
Sakal