राग, वाद अन् अपमान... ‘या’ 5 प्रसंगी शांत राहण्याची गौतम बुद्धांची शिकवण

Anushka Tapshalkar

बुद्ध पौर्णिमा आणि शांततेची शिकवण

बुद्ध पौर्णिमा म्हणजे भगवान Gautama Buddha यांच्या जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाणाशी जोडलेला पवित्र दिवस. या दिवशी त्यांच्या शांतता, संयम आणि विचारपूर्वक बोलण्याच्या शिकवणींचे स्मरण केले जाते.

Gautam Buddha Teachings

|

sakal

रागाच्या क्षणी शांत राहा

रागाच्या भरात शब्दांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते. संतापाच्या क्षणी शांत राहिल्यास नात्यांमध्ये कटुता निर्माण होत नाही आणि अनावश्यक वादही टाळता येतात.

Gautam Buddha Teachings

|

sakal

वाद वाढत असेल तर मौन पाळा

काही लोक फक्त स्वतःचे मत मांडतात, पण दुसऱ्यांचे ऐकून घेत नाहीत. अशा वेळी वाद वाढवण्यापेक्षा शांत राहणे अधिक शहाणपणाचे ठरते.

Keep Calm

|

sakal

अपमानाला शांततेने उत्तर द्या

जर कोणी मुद्दाम तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असेल, तर प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे गरजेचे नसते. अनेकदा शांतता हीच सर्वात प्रभावी प्रतिक्रिया ठरते.

Gautam Buddha Teachings

|

sakal

वैयक्तिक गोष्टींना मर्यादा ठेवा

वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रत्येकाला सर्व काही सांगणे योग्य नसते. कोणी अति चौकशी करत असेल, तर मर्यादा जपून शांत राहणे आवश्यक आहे.

Gautam Buddha Teachings

|

sakal

अपूर्ण ज्ञानावर बोलणे टाळा

अपूर्ण माहितीवर बोलल्याने गैरसमज निर्माण होऊ शकतात. एखाद्या विषयाची पूर्ण माहिती नसेल, तर आधी समजून घेणे आणि मगच मत व्यक्त करणे अधिक योग्य ठरते.

शांतता हीच खरी ताकद

Gautama Buddha यांच्या शिकवणीनुसार योग्य वेळी शांत राहणे ही कमजोरी नसून शहाणपणाची खूण आहे. संयम आणि विचारपूर्वक वागणारा व्यक्ती समाजात अधिक आदर मिळवतो.

Gautam Buddha Teachings

|

sakal

भांडण छोटं असो की मोठं...पण रागाच्या भरात जोडीदाराला चुकूनही बोलू नका 'हे' 4 शब्द

Relationship Tips

|

sakal

आणखी वाचा