गावाकडच्या चवीचं झणझणीत भरलेलं वांगं; खाल तर बोटं चाटत राहाल!

Aarti Badade

महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीची शान

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पारंपरिक आणि अतिशय लोकप्रिय असलेला चविष्ट पदार्थ म्हणजे गावरान भरलेलं वांग.

Gavran bharleli vangi

|

Sakal

आवश्यक मुख्य साहित्य

या रेसिपीसाठी लहान जांभळी वांगी, कांदा, भाजलेले शेंगदाणे, सुके खोबरे, चिंच-गूळ आणि पारंपरिक मसाले लागतात.

Gavran bharleli vangi

|

Sakal

खमंग मसाला सारण तयार करा

शेंगदाणे, खोबरे आणि कांदा जाडसर वाटून त्यात तिखट, हळद, गोडा मसाला, मीठ आणि चिंच-गूळ एकत्र करा.

Gavran bharleli vangi

|

Sakal

वांग्यांमध्ये मसाला भरा

लहान वांग्यांना क्रॉस आकारात चिरा देऊन तयार केलेला खमंग मसाला त्यात व्यवस्थित भरून घ्या.

Gavran bharleli vangi

|

Sakal

कढईत फोडणी आणि वांगी परतणे

कढईत तेल गरम करून कांदा परता, मग भरलेली वांगी आणि उरलेला मसाला घालून हलक्या हाताने मिक्स करा.

Gavran bharleli vangi

|

Sakal

मंद आचेवर वाफवून शिजवा

थोडं पाणी घालून झाकण ठेवा आणि मंद आचेवर २० ते २५ मिनिटे वांगी मऊ होईपर्यंत छान शिजू द्या.

Gavran bharleli vangi

|

Sakal

गरमागरम भाकरीसोबत सर्व्ह करा

वरती ताजी कोथिंबीर भुरभुरून हे झणझणीत भरलेलं वांग ज्वारी किंवा बाजरीच्या गरम भाकरीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

Gavran bharleli vangi

|

Sakal

चवीला खमंग अन् आरोग्यासाठी वरदान! 'कारळ्याची' चटणी 'या' 7 समस्यांपासून ठेवते दूर

Karala Chutney Benefits

|

Sakal

येथे क्लिक करा