Aarti Badade
मातीच्या मटक्यात मंद आचेवर शिजवलेले मसालेदार चिकन चवीला खास लागते. घरच्या घरी गावरान पद्धतीने मटका चिकन बनवण्याची सोपी कृती जाणून घ्या.
Gavran Matka Chicken
Sakal
एक किलो चिकनमध्ये दोन चमचे दही, हळद, आले-लसूण पेस्ट, मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून मिश्रण चांगले एकजीव करा. हे चिकन १५ ते २० मिनिटे मुरण्यासाठी ठेवा.
Gavran Matka Chicken
Sakal
कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा, खोबरे आणि आवडीनुसार काजू घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
Gavran Matka Chicken
Sakal
मटक्यात तेल गरम करून त्यात तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि वेलची यांसारखे खडे मसाले घाला. त्यानंतर चिरलेला कांदा परतून त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
Gavran Matka Chicken
Sakal
कांदा-टोमॅटोच्या मिश्रणात तयार वाटण, लाल तिखट, गावरान मसाला आणि धणे-जिरे पूड घालून परता. आता मुरवलेले चिकन घालून सर्व मसाले त्याला व्यवस्थित लागतील असे एकत्र करा.
Gavran Matka Chicken
Sakal
चिकन शिजण्यासाठी आवश्यकतेनुसार थोडे गरम पाणी घाला आणि मटक्यावर झाकण ठेवा. मंद आचेवर चिकन पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवा; मातीचे भांडे थेट गॅसवर वापरण्यायोग्य असल्याची खात्री करा.
Gavran Matka Chicken
Sakal
चिकन पूर्ण शिजल्यावर त्यात गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम गावरान मटका चिकन ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत सर्व्ह करा.
Gavran Matka Chicken
Sakal
AI Predicts Lifespan Single Photo
Sakal