सकाळ डिजिटल टीम
गावारच्या शेंगा रोज खाल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळतात आणि यात कोणते औषधी गुणधर्म आहेत जाणून घ्या.
गवारमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्या उपयुक्त ठरू शकतात.
गवारमध्ये असलेले फायबर आणि पोटॅशियम रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
गवारमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हे फायबर बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास फायदेशीर मानले जाते.
गवारमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडे मजबूत होतात आणि हाडांशी संबंधित रोगांपासून बचाव होतो.
गवारच्या शेंगांमध्ये लोह (Iron) भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते, ज्यामुळे ॲनिमियाच्या (रक्तक्षय) समस्येवर मात करण्यास मदत मिळते.
गवारमध्ये फॉलिक ॲसिड आणि इतर आवश्यक जीवनसत्त्वे असल्यामुळे गर्भवती महिलांसाठी ती खूप चांगली मानली जाते.
कमी कॅलरी आणि अधिक फायबर असल्याने गवारचे सेवन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.
गवारमधील पोषक घटक मेंदूच्या कार्याला चालना देतात आणि मज्जासंस्थेचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.
रिकाम्या पोटी चहा-कॉफी प्यावी की नाही?