Monika Shinde
2025 ते 2039 दरम्यान जन्मणारी पिढी म्हणजे जनरेशन बीटा. ही मुलं तंत्रज्ञानासोबत वाढणार, त्यामुळे त्यांचं संगोपन अधिक विचारपूर्वक आणि सजगतेने करावं लागेल.
AI, स्मार्ट गॅजेट्स, स्क्रीन यांचा प्रभाव वाढत चाललेला आहे. त्यामुळे पालकांनी स्वतःही डिजिटल जगात अपडेट राहून योग्य सवयी लावण्यासाठी मार्गदर्शक भूमिका घ्यावी.
मुलांशी फक्त सूचना देण्याऐवजी संवाद साधा. त्यांच्या भावना समजून घ्या. तुम्ही त्यांचे "mentor" आहात, फक्त "controller" नाही.
संपूर्ण बंदी न घालता, शिस्तबद्ध पद्धतीने स्क्रीन टाइमची मर्यादा ठेवा. शैक्षणिक, क्रिएटिव्ह आणि व्यावहारिक वापर यामध्ये फरक समजावून सांगा.
भावनिक आणि मानसिक आरोग्य लहानपणापासूनच महत्त्वाचं आहे. मेडिटेशन, खुली चर्चा, भावनिक बुद्धिमत्ता यावर भर द्या.
सामाजिक मूल्यं, सामायिक जबाबदारी आणि सहकार्य यांची जाणीव करून द्या. वस्तू शेअर करणे, इतरांशी सहानुभूतीने वागणे शिकवा.
मुलांनी कोण बनावं हे ठरवू नका, तर त्यांना स्वतःची ओळख शोधायला मदत करा. त्यांच्या आवडी, मतं आणि विचारांना स्वीकारा.