Monika Shinde
महात्मा गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे. त्यांना साध पण पौष्टिक आहार आवडायचा, ज्यामुळे ते तंदुरुस्त राहायचे. चला तर मग जाणून घेऊयात त्यांना कोणते खाद्यपदार्थ आवडायचे
Mahatma Gandhi
sakal
महात्मा गांधींना साध पण पौष्टिक आहार आवडायच. ते सात्विक आहारावर विश्वास ठेवत. त्यांच्या आहारात नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा समावेश होता.
Nutritious food
Sakal
गांधीजींना गुजरातमधील माव्याचा पेढा खूप आवडायचा. हा गोड पदार्थ त्यांचे आवडते खाद्यपदार्थांपैकी एक होता.
दुधी भोपळा त्यांना उकडून खायला आवडायचा.
बीट आणि वांग यांच्या भाज्यांना ते प्राधान्य द्यायचे. भाज्या उकडून आणि साध्या प्रकारे खाणे त्यांना पसंत होते.
डाळ-भात हा त्यांचा मुख्य आहार होता. सोपा पण तत्त्वबद्ध आहार त्यांच्या तंदुरुस्तीचा मुख्य आधार होता.
महात्मा गांधींना दही आणि ताक खूप आवडायचे. पचन सुधारण्यासाठी ते नियमित दही आणि ताक घेत.
बदामाचे दूध स्वतः बनवून प्यायचे. बदामाचा शिरा आणि सुका मेवा त्यांचे आवडते गोड पदार्थ होते.