Anushka Tapshalkar
'लाल सोनं' म्हणून ओळखलं जाणारं केशर अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांनी भरलेलं असतं. यामुळे त्वचा उजळते व त्वचेचं टेक्सचर सुधारून कोरडेपणा कमी होतो. पुढे दिलेल्या मास्कचा मदतीने तुम्हीही हिवाळ्यात चमकदार त्वचा मिळवू शकता.
केशर त्वचेसाठी लाभदायक असून फोड, सुरकुत्या आणि सूज कमी करण्यास मदत करते. 2-3 चमचे दूधात केशर भिजवून तयार केलेले मिश्रण चेहरा व मानेवर लावून 15-20 मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचा हायड्रेट होऊन चमकदार दिसते.
मध त्वचेतील मॉइस्चर टिकवून ठेवते तर केशर त्वचा उजळते. तसेच चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यास मदत करते. ३-४ केशराच्या काड्या एक चमचा मधात मिसळून चेहरा आणि मानेवर लावून 15 मिनिटांनी धुवा.
दोन चमचे कोरफडीच्या गरात केशर मिसळा. हा मास्क चेहऱ्यावर 20 मिनिटांसाठी लावा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा मऊ होते.
थोड्या पाण्यात रात्रभर थोडे केशर भिजवून ठेवा. नंतर हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि दिवसभर फ्रेश राहण्यासाठी चेहऱ्यावर स्प्रे करा.
तुमच्या नाईट क्रीम मध्ये किंवा सिरममध्ये थोडेसे केशर मिक्स करा आणि झोपण्यापूर्वी हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे रात्रभर त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा निरोगी राहते.
हिवाळ्यात त्वचा उजळ आणि मऊ ठेवण्यासाठी केशराचा वापर आठवड्यातून दोन ते तीन वेळा जरूर करा. यामुळे त्वचेला डलनेस कमी होतो आणि त्वचा चमकदार दिसते.