रताळी की बटाटा? कोणता पर्याय अधिक आरोग्यदायी?

Aarti Badade

पौष्टिकतेत कोण सरस?

रताळ्यामध्ये व्हिटॅमिन A, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे ते बटाट्यापेक्षा अधिक पौष्टिक मानले जाते.

Sweet Potato or Potato

|

Sakal

डोळे आणि त्वचेसाठी फायदेशीर

रताळ्यातील बीटा-कॅरोटीन शरीरात व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होते, जे डोळ्यांचे आरोग्य आणि त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास मदत करते.

Sweet Potato or Potato

|

Sakal

रक्तातील साखर नियंत्रणात

रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते.

Sweet Potato or Potato

|

Sakal

पचनासाठी उत्तम

रताळ्यातील भरपूर फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास उपयुक्त ठरते.

Sweet Potato or Potato

|

Sakal

बटाट्याचे फायदेही जाणून घ्या

बटाट्यामध्ये पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. त्यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते.

Sweet Potato or Potato

|

Sakal

वजन वाढण्याचा धोका?

बटाट्यात स्टार्च आणि ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने त्याचे अतिसेवन केल्यास वजन वाढणे किंवा रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.

Sweet Potato or Potato

|

Sakal

कोणता पर्याय निवडावा?

वजन नियंत्रण, चांगले पचन आणि अधिक पोषण हवे असल्यास रताळी उत्तम पर्याय ठरू शकते. मात्र, संतुलित प्रमाणात खाल्ल्यास रताळी आणि बटाटा दोन्हीही आरोग्यदायी आहाराचा भाग होऊ शकतात.

Sweet Potato or Potato

|

Sakal

चेहऱ्यावर जास्त तेल येते? पावसाळ्यात फॉलो करा 'या' स्किनकेअर टिप्स

Control Oily Skin During the Monsoon

|

sakal

येथे क्लिक करा