स्प्लिट एंड्सना करा आता कायमचं बाय बाय! 'या' 5 तेलांनी मिळेल सॉफ्ट-शायनी लूक

Anushka Tapshalkar

स्प्लिट एंड्स का होतात?

वारंवार हीट स्टायलिंग, केसांना रंग, सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे केस कोरडे व कमजोर होतात. त्यामुळे टोकांना फाटे (Split Ends) फुटतात.

Hair Spilt Ends

|

sakal

खोबरेल तेल (Coconut Oil)

लॉरिक अ‍ॅसिडमुळे खोबरेल तेल केसांच्या आतपर्यंत पोहोचतं. हे तेल केसांना खोलवर पोषण देऊन तुटणे आणि फाटे कमी करते आणि नैसर्गिक शाइन देते.

Coconut Oil

|

sakal

एरंडेल तेल (Castor Oil)

जाडसर एरंडेल तेल केस मजबूत करतं आणि ओलावा लॉक करतं. हे डीप कंडिशनिंग हेअर मास्कसाठी उपयुक्त असून हलक्या तेलासोबत मिसळून वापरणं उत्तम ठरतं.

Castor Oil | sakal

आर्गन तेल (Argan Oil)

‘लिक्विड गोल्ड’ म्हणून ओळखलं जाणारं आर्गन तेल व्हिटॅमिन E आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेलं असतं. केस मऊ, चमकदार बनवून स्प्लिट एंड्स सील करतं.

Argan Oil

|

sakal

जोजोबा तेल (Jojoba Oil)

स्कॅल्पच्या नैसर्गिक तेलासारखं असलेलं जोजोबा तेल केसांना न चिकटता मॉइश्चर देतं. केस कोरडे होण्यापासून वाचवून स्प्लिट एंड्स कमी करतं.

Jojoba Oil

|

sakal

बदाम तेल (Almond Oil)

हलके आणि नॉन-ग्रीसी बदाम तेल केसांची लवचिकता वाढवतं. कोरडे, रफ टोक स्मूथ करून केस फाटण्यापासून वाचवते.

Almond Oil

|

sakal

लक्षात ठेवा!

स्प्लिट एंड्ससाठी ट्रिमिंग आवश्यकच आहे, पण ही तेलं नियमित वापरल्यास केस अधिक मजबूत, निरोगी आणि चमकदार दिसतात.

|

sakal

महागडे ट्रीटमेंट्स विसरा, केस वाढवणारी खरी ताकद 'यात' आहे

Hair Growth Nutrients

|

sakal

आणखी वाचा