महागडे ट्रीटमेंट्स विसरा, केस वाढवणारी खरी ताकद 'यात' आहे

Anushka Tapshalkar

बायोटिन (व्हिटॅमिन B7)

केसांची मुळापासून मजबुती वाढवतो आणि केराटिन निर्मितीस मदत करतो. अंडी, बदाम, अक्रोड, सॅल्मनमध्ये भरपूर प्रमाणात आढळतो.

Biotin 

|

sakal

व्हिटॅमिन D

केसांच्या फॉलिकल्सची वाढ सक्रिय ठेवतो. कमतरता असल्यास केस गळू शकतात. सूर्यप्रकाश, फॅटी फिश आणि फोर्टिफाइड दूध उपयुक्त.

Vitamin D

|

sakal

लोह (Iron)

केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी आवश्यक. महिलांमध्ये केस गळतीचे हे एक प्रमुख कारण ठरते. पालक, डाळी, लाल मांसातून मिळतो.

Iron

|

sakal

झिंक (Zinc)

केसांचे नुकसान भरून काढतो आणि टाळूतील तेलग्रंथी संतुलित ठेवतो. भोपळ्याच्या बिया, काजू, हरभरा चांगले स्रोत आहेत.

Zinc

|

sakal

व्हिटॅमिन E

टाळूचे संरक्षण करून केसांना नैसर्गिक चमक देतो. बदाम, सूर्यफूल बिया, अ‍ॅव्होकॅडोमध्ये आढळतो.

Vitamin E

|

sakal

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स

टाळू कोरडी होऊ देत नाहीत आणि केसांची जाडी सुधारतात. मासे, अळशीच्या बिया, चिया सीड्स फायदेशीर.

Omega-3 Fatty Acids

| sakal

प्रथिने (Protein)

केसांचा मुख्य घटक. पुरेसे प्रथिने न मिळाल्यास केस वाढ खुंटते. अंडी, डाळी, दूध, सोया, मासे यांचा आहारात समावेश करा.

Protein

|

sakal

नैसर्गिकरीत्या काळे डाग कमी करणारे 7 घरगुती उटणे

Ayurvedic Ubtans for Spot Less Skin

|

sakal

आणखी वाचा