Anushka Tapshalkar
तरुण, टवटवीत आणि सुंदर दिसण्यासाठी फक्त ब्यूटी प्रोडक्ट्स वर अवलंबून न राहता, आरोग्यदायी सवयी अंगीकारणं खूप महत्त्वाचं आहे. या ७ सवयींनी तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य आणि आरोग्य मिळवायला मदत होईल.
अन्नात अँटीऑक्सिडंट्स (बेरीज, पालक), हेल्दी फॅट (बदाम, अक्रोड) आणि प्रथिने (डाळी, अंडी) यांचा समावेश करा. त्याचबरोबर साखर आणि जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा, कारण ते त्वचेचं नैसर्गिक तेज कमी करतात.
पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं आणि त्वचेला लवचिक बनवतं. त्यामुळे त्वचेला टवटवीत आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी रोज ८-१० ग्लास पाणी प्या. तसेच पाण्यात लिंबू किंवा पुदिन्याची पानं टाका, यामुळे अतिरिक्त अँटीऑक्सिडंट्स मिळतील व त्वचा टवटवीत दिसेल.
दररोज ७-९ तासांची शांत झोप घ्या. झोपेमुळे शरीरातील पेशी दुरुस्त होतात आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं. झोपेपूर्वी फोन किंवा स्क्रीनचा वापर टाळा आणि शांत झोप घ्या.
तणाव त्वचेला नुकसान पोहोचवतो, सुरकुत्या निर्माण करतो आणि त्वचा निस्तेज दिसते. ध्यान, योग, किंवा जर्नलिंगच्या मदतीने तणावावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक विचारसरणी अंगीकारा आणि स्वत:ला आनंदी ठेवा.
रोज किमान ३० मिनिटं चालणे, योग किंवा व्यायाम करा. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते. स्ट्रेचिंगमुळे शरीर लवचिक राहतं आणि पोश्चर सुधारतं.
बाहेर पडताना एसपीएफ ३० किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन लावा. टोपी आणि सनग्लासेससारखे संरक्षक उपाय वापरा. यामुळे त्वचेचं वृद्धत्व रोखलं जातं आणि सुरकुत्या कमी होतात.
स्वच्छता, मॉइश्चरायझिंग, आणि सनस्क्रीन वापरण्याचा दिनक्रम ठेवा. आठवड्यातून एकदा त्वचा एक्सफोलिएट करा, ज्यामुळे त्वचेतील मृत पेशी निघून जातात. रेटिनॉल किंवा व्हिटॅमिन सीयुक्त उत्पादनं वापरून त्वचेची काळजी घ्या.